
चीनमध्ये कोरोनाने कहर केला आहे. सध्या चीनची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अहवालानुसार, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सब-व्हेरियंट (Omicron Sub-variant BF.7) चीनमध्ये वेगाने पसरत आहे आणि आता भारतात 3 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दरम्यान, चिनी गायकाने एक धोकादायक निर्णय घेतला आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चिनी गायिका जेन झांग (Jane Zhang) हिने जाणूनबुजून स्वतःला कोरोना व्हायरसची लागण करून घेतली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वजण तिच्यावर टीका करत आहेत. सर्वांनाच हे जाणून घ्यायचे आहे की, एक व्यक्ती स्वतः आपल्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल. चिनी गायिका जेन झांगने स्वत: सोशल मीडियावर कोरोना व्हायरसची लागण होण्याच्या आपल्या योजनेबद्दल खुलासा केला.
View this post on Instagram
जेन झांग म्हणाली की, ती अशा घरात मुद्दाम गेली जिथे कोरोनाची लागण झालेले लोक होते. यानंतर तिला डोकेदुखी, ताप आणि घसादुखी अशी कोरोनाची सामान्य लक्षणे जाणवू लागली. परंतु त्यानंतर ती यातून बरीही झाली.
Singer Zhang Liangying aka Jane Zhang actually courted Covid so that she won’t be sick by New Year.
She has since apologized. pic.twitter.com/SDr1ZuFjly
— Eddie Du (@Edourdooo) December 16, 2022
लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र गायिकेने आपली पोस्ट हटवून लोकांची माफी मागितली. जेन झांगने यामागचे सांगितलेले कारण धक्कादायक आहे. ती म्हणाली की, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसाठी ती एक संगीत कार्यक्रम करत आहे व सध्या त्याची तयारी जोरात सुरु आहे. या कार्यक्रमावेळी तिला कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका टळावा म्हणून तिने आधीच स्वतःला कोरोना विषाणूची लागण करून घेतली, जेणेकरून ती डिसेंबरच्या अखेरीस संगीत कार्यक्रमावेळी कोविड पॉझिटिव्ह होऊ नये.
कोरोनाचा नवीन प्रकार तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही, फक्त ‘हे’ घरगुती उपाय करा