मोठी बातमी! रेशन कार्डबाबत केंद्राने केला ‘हा’ मोठा बदल

WhatsApp Group

नवी दिल्ली – तुम्हीही शिधापत्रिकाधारक (ration cards) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने (Central Government) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढवला आहे. अनेक राज्य (State) आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना पूर्वीपेक्षा आता कमी गहू मिळणार आहेत.

खरं तर, केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मे ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी केला आहे. यानंतर, PMGKAY अंतर्गत बिहार, केरळ (Kerala) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या ३ राज्यांना मोफत वितरणासाठी गहू दिला जाणार नाही.

याशिवाय दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. उर्वरित २५ राज्यांच्या कोट्यात कोणताही बदल करण्यात आला नाहीय.