होळीच्या दिवशी लोकांचा आनंदोत्सव सुरू असतानाच मलाई मंदिर परिसरात भीषण अपघात झाला. येथे एका वेगवान थारने अनेकांना चिरडले. या अपघातात 5 हून अधिक जण जखमी झाले आहेत. थारचा वेग इतका जास्त होता की त्याने इतर दोन वाहनांनाही धडक दिली. पोलिसांचे म्हणणे आहे की, वेग खूप होता, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले.
या घटनेबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृत निवेदन समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ‘वेगवान थारने मलाई मंदिर परिसरात अनेकांना चिरडले. या अपघातात 5 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर अन्य 2 वाहनांनाही थारने धडक दिली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, थारचा वेग जास्त होता आणि त्याचे नियंत्रण सुटले. पुढील तपास सुरू आहे.
Delhi | A speeding Thar crushed many people in Malai Mandir area. More than 5 people have been injured in the accident. Thar has also hit 2 other vehicles. Preliminary probe revealed that Thar was overspeeding and lost control. Further probe underway: Delhi Police pic.twitter.com/JgKDPhNxhi
— ANI (@ANI) March 8, 2023
होळीच्या दिवशी दिल्लीतील मुंडका भागातील फ्रेंड्स एन्क्लेव्हजवळ दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात आणि चाकूच्या हल्ल्यात दोन जण ठार झाले. या घटनेत 7 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 1:36, 1:42 आणि 1:47 वाजता एका व्यक्तीच्या भांडण, चाकूने वार करून मृत्यू झाल्याबद्दल पीसीआर कॉल आले होते. या माहितीवरून पोलीस मुंडका येथील फ्रेंड्स कॉलनी येथील डी-15 ए येथे पोहोचले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील गल्लीत राहणारा सोनू आणि अभिषेक यांच्यात येथे भांडण झाले. अभिषेक आणि त्याच्या मित्रांनी सोनूला मारहाण केली आणि मध्यस्थांनाही धक्काबुक्की केली. यानंतर सोनूच्या गटातील लोकांनी अभिषेकलाही मारहाण केली आणि त्यालाही धक्काबुक्की केली. या भांडणात सोनू आणि नवीन यांचा मृत्यू झाला तर अभिषेक आणि अन्य एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अन्य तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांवरही जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.