IPL 2022 : सगळ्या टीमचे कॅप्टन जाहीर, 8 भारतीय तर 2 परदेशी दिग्गजांकडे नेतृत्व

WhatsApp Group

आयपीएल 2022 ला (IPL 2022) आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला सुरूवात होणार आहे. पहिलाच सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यामध्ये होणार आहे.

आयपीएलच्या या मोसमापासून 8 ऐवजी 10 टीम सहभागी झाल्या आहेत, त्यामुळे स्पर्धेचा फॉरमॅटही बदलण्यात आला आहे. या 10 टीमना 5-5 च्या ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे, असे असले तरी मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही प्रत्येक टीम 14 सामनेच खेळणार आहे.

शनिवारी आरसीबीने त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेचा फाफ डुप्लेसिस हा आरसीबीचा नवा कॅप्टन असेल. विराट कोहलीने (Virat Kohli) मागच्या मोसमामध्ये कर्णधारपद सोडल्यानंतर आता ही डुप्लेसिवर जबाबदारी देण्यात आली आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये चार विकेट कीपरकडे टीमची कॅप्टन्सी आहे, तर दोन परदेशी खेळाडूंना टीमचे नेतृत्व देण्यात आले आहे आणि उरलेल्या 8 टीमचे कर्णधार भारतीय आहेत.

आयपीएल टीमचे कर्णधार

  • मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा
  • चेन्नई सुपर किंग्स- एमएस धोनी (विकेट कीपर)
  • कोलकाता नाईट रायडर्स- श्रेयस अय्यर
  • सनरायजर्स हैदराबाद- केन विलियमसन (न्यूझीलंड)
  • दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत (विकेट कीपर)
  • राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (विकेट कीपर)
  • गुजरात टायटन्स- हार्दिक पांड्या
  • लखनऊ सुपर जाएंट्स- केएल राहुल (विकेट कीपर)
  • पंजाब किंग्स- मयंक अग्रवाल
  • आरसीबी- फाफ डुप्लेसिस (दक्षिण आफ्रिका)

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ग्रुप-ए मध्ये मुंबई, कोलकाता, राजस्थान, दिल्ली आणि लखनऊ यांचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये चेन्नई, बँगलोर, गुजरात, हैदराबाद आणि पंजाब या संघांचा समावेश आहे.