अमरावती – राज्यात अद्यापही एसटी बंद असल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक जोर धरत आहे. दरम्यान आता अहमदनगर शहरातील अर्जुन नगर परिसरामध्ये खासगी बस नाल्यामध्ये पलटली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीवरुन मोर्शीमार्गे ही बस मध्य प्रदेशकडे जात होती. सुदैवाने या अपघातामद्धे जीवितहानी झाली नाही, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसमध्ये ४० पेक्षा अधिक प्रवासी होते. अमरावती-नागपूर महामार्गावरील अर्जुननगर परिसरातीमध्ये ही घटना घडली आहे.
अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशातील बैतुलकडे एक खासगी बस जात होती. ही खाजगी बस नाल्यामध्ये पलटी झाल्याची घटना अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातीमधील अर्जुन नगर परिसरामध्ये घडली आहे. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. या अपघामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
बसमध्ये जवळपास चाळीसपेक्षा जास्त प्रवासी होते. बस पूर्ण क्षमतेने भरली होती. दरम्यान, किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेले आहे. अपघाताचे कारण अस्पष्ट असून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.