Video: अजब गजब…म्हशींन दिला पांढऱ्या शुभ्र रेडकुला जन्म!

WhatsApp Group

म्हैस म्हटली की काळी कुळकुळीत. अशी काळीकुट्ट म्हैसच आपल्या नजरेसमोर येते. तिचं रेडकू म्हटलं तर ते देखील तिच्यासारखंच काळं असतं. पण सध्या अशा म्हैस आणि रेडकूचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यांना पाहून सर्वजण चकित झाले आहेत. म्हशीने अशा रेडकाला जन्म दिला आहे की त्यांचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.

पालघर जिल्ह्यामधील टाकवहाल गावातील म्हैस आणि तिचं रेडकू चर्चेत आलं आहे. इथं राहणारे समीर पटेल यांची ही म्हैस आणि रेडकू. यांना पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. हे रेडकू अनेकांसाठी कुतूहलाचा विषय बनलं आहे. याचं कारण म्हणजे त्यांचा रंग.

काळ्या म्हशीचं रेडकूही तिच्यासारखंच काळं असणार असं आपण म्हणतो. पण कधी काळ्याकुट्ट म्हशीचं पांढरंशुभ्र रेडकू तुम्ही पाहिलं आहे का? पहिलं नसेल ना? तुम्हाला वाटेल आम्ही मस्करी करत आहोत. तुमचा यावर विश्वासच बसणार नाही. पण हे खरं आहे. प्रत्यक्षात एका काळ्या म्हशीने पांढऱ्याशुभ्र रेडकूला जन्म दिला आहे.

 

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा