नांदेड – नांदेड Nanded शहरातील चिरागगल्ली परिसरामधून हत्येची एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या धाकट्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. नराधम आरोपीने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत लहान भावाचा जीव घेतला आहे. हत्येची ही थरारक घटना उघडकीस येताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी आता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास इतवारा पोलीस करत आहेत.अरुणसिंह बालाजीसिंह ठाकूर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो नांदेड शहरातीमधील चिरागगल्ली परिसरातील रहिवासी होता.
तर जुगनूसिंह ठाकूर असे मारेकरी भावाचे नाव आहे. या प्रकरणी इतवारा पोलिसांनी आई गंगाबाई ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाला अटक करून त्याला न्यायालयात दाखल केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.