पाहा व्हिडिओ, सावंतवाडीच्या माडखोल धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – सावंतवाडी जवळ असलेल्या माडखोल धरणात अर्जुन पाताडे हा युवक बुडाला होता. मात्र 2 दिवस त्याच्या मृतदेहाचा पोलिसांकडून शोध सुरू होता. आज सकाळी अर्जुनचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. माडखोलचे माजी ग्रामपंच्यायत सदस्य दत्ताराम कोळमेकर यांनी ही माहिती दिली. अर्जुन ज्या ठिकाणी बुडाला होता त्याच ठिकाणी त्याचा मृतदेह आढळून आला.

माडखोल धरणात अर्जुन पाताडेसह 3 युवक पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यातील एक माडखोलचा तर दोघे सावंतवाडी येथील राहणारे होते. पार्टी झाल्यानंतर हे युवक पोहण्यासाठी माडखोल धरणाच्या पाण्यात उतरले, मात्र अर्जुन पाताडे याला पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणात बुडाला.

सावंतवाडीच्या या माडखोल धरणात अश्या घटना अनेक वेळा घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे आता घडलेल्या सर्व प्रकारामुळे माडखोलच्या धरणावर नजर ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत राहतील म्हणून यापुढे धरणात आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांवर यापुढे नजर ठेवण्यात येईल.

याआधी पण दारू पार्टी करण्यासाठी आलेले तरुण, तरुण मुले बुडल्याच्या घटना ऐकल्या आहेत. अर्जुन पाताडे या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पोहता येत नसताना देखील तो पाण्यात मज्जा करण्यासाठी उतरला मात्र त्याला पुढे पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडाला. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेताना स्वताच्या जिवाची पर्वा घेणे खूप गरजेचे आहे.

या भागात तशी वस्ती नाहीय, त्यामुळे कोणी बुडाला तरी त्याला लवकरात लवकर वाचवणे शक्य नाही, त्यामुळे फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी आपली आणि आपल्यासोबत असणाऱ्या लहान मुलांची काळजी घेणं गरजेचे आहे. आपल्याला जर पोहता येत नसेल तर चुकुनही या धरणात उतरण्याचा प्रयत्न कोणी करू नये. असे केल्यास पाण्यात उतरणाऱ्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा या पर्यटन स्थळाची सुरक्षा ऐरणीवर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या ठीकणी दिवसातून एकदातरी  फेरी मारणे गरजेचे आहे. जेणेकरून येथे येणारे पर्यटक गैरकृत्य करण्याआधी थोडा तरी विचार करतील.