नाशिक – नाशिकमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महिला वैद्कीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या महितीनुसार, सुवर्णा वाजे असे त्या महिलेचे नाव आहे.
सुवर्णा वाजे या महानगरपालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. विल्होळी परिसरात सुवर्णा वाजे या स्वताच्या चारचाकी गाडीमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. सुवर्णा वाजे यांचा घातपात झाला की अन्य काही कारण आहे का याबाबत आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.