मन सुन्न करणारी घटना; झाडाला लटकलेले आढळले दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह

WhatsApp Group

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये बुधवारी दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. ज्यांचे मृतदेह सापडले त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. हे प्रकरण लखीमपूर खेरी येथील निघासन कोतवालीचे आहे. येथे गावाबाहेरील एका उसाच्या शेतात किशोरवयीन मुलींचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी लखीमपूर खेरीचे एसपी संजीव सुमन यांनी मीडियाला माहिती दिली आहे.

लखीमपूरचे एसपी म्हणाले, “कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या सहा जणांची नावे आहेत. या संपूर्ण प्रकरणात नाव असलेल्या सहाही आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये लग्नाच्या दबावामुळे मुलींची हत्या करण्यात आली आहे. हत्येपूर्वी मुलीवर बलात्कार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी सांगितले की, “सर्व लोकांनी मिळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मुलीला लटकवून ठार मारले. पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू असून अधिक चौकशी केली जाईल. जुनैद, सुहेल, हाफिजुर रहमान आणि जुनैदला चकमकीनंतर अटक करण्यात आली. मुख्य आरोपी, त्याच्या शेजारी राहणारा, छोटू, त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. त्याने तीन मुलांची मुलींशी ओळख करून दिली. त्यानंतर त्यांची मैत्री झाली होती.