संगमनेर – अहमदनगर जिल्ह्यामधून (Ahmednagar district) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका विहिरीमध्ये आईसह तीन लहान मुलांचे मृतदेह (Mother and three children found dead) आढळून आले आहेत. तीन लहान मुलांमध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यामधील खांडगेदरा गावामध्ये (Khandgedara Sangamner) ही घटना घडली आहे. या घटनेमुळे आता सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
संगमनेर तालुक्यामधील खांगेदरा गावामध्ये असलेल्या विहिरीत शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास विहिरीमध्ये चार मृतदेह तरंगताना आढळून आले. चार मुलांमध्ये 28 वर्षीय आई स्वाती ढोकरे, पाच वर्षीय मुलगी भाग्यश्री, साडे तीन वर्षीय मुलगी तन्वी आणि सहा महिन्यांचा मुलगा शिवम यांचा समावेश आहे.
हे सर्व मृतक खांडगेदरा गावामधील निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. विहिरीमध्ये मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्वांचे मृतदेह विहिरीतून काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
आत्महत्या की घातपात?
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून शवविच्छेदनाचे रिपोर्ट्स आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण काय आहे याबाबतची माहिती समोर येईल. दरम्यान गावातील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात आहे याबाबत गावात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. संगमनेर तालुक्यातीमधील घारगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पोलीस विविध अँगलने तपास करत आहेत. तपासाअंती हे नेमके काय प्रकरण आहे याची माहिती समोर येईल.