कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह तब्बल 16 महिने शवागारात होते पडून!

WhatsApp Group

कर्नाटक- बंगळुरूमधून एक धक्कादायक आणि विचीत्र घटना समोर आली आहे. बंगळुरूमधील राजाजीनगरच्या एका रुग्णालयात दोन मृतदेह सापडले आहेत. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असून, या व्यक्तींचा पहिल्या लाटेत मृत्यू झाला होता. हे मृतदेह शवागारात सापडले आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, मात्र रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ते होऊ शकले नाही.

बेंगळुरू येथील रहिवासी असलेल्या दुर्गा यांचा 5 जुलै रोजी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यू झाला. मृतदेह त्यांच्या मुलीच्या ताब्यात दिला नाही. दुर्गा यांच्या मुलीला वाटले होते की, आपल्या आईवर रुग्णालयाने अंत्यसंस्कार केले आहेत. मात्र शनिवारी हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या दोन मृतदेहांपैकी एक मृतदेह त्याच्या आईचा होता, ज्यांचा मृत्यू सुमारे 500 दिवसांपूर्वी झाला होता. दुर्गाशिवाय दुसरा एक मृतदेह सापडला आहे. ज्यांचे वय 68 वर्षे होते आणि 2 जुलै रोजी त्यांचे निधन झाले. भाजप आमदार सुरेश कुमार यांनी रुग्णालय प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.


हे रुग्णालय केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मॉडेल अंतर्गत येते. रुग्णालयात दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यानंतर साफसफाई कर्मचारी रिकामे शवागार साफ करण्यासाठी गेले असता त्यांना येथे दोन मृतदेह आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवगृह नवीन इमारतीत हलवण्यात आले आहे. अशा स्थितीत फ्रीजरमध्ये पडलेल्या दोन्ही मृतदेहांकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पूर्ण देशभरातून रुग्णालय प्रशासनावर टीका होत आहे.

जेव्हा बंगळुरूमध्ये कोरोनाचा कहर सुरू होता. जेव्हा प्रशासन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देत नव्हते. कुटुंबीयांच्या उपस्थितीत बेंगळुरू महानगरपालिकेने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्याचवेळी सोमवारी दुर्गा आणि मणिराजू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा परिस्थितीत दोघांच्याही कुटुंबीयांना आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे.