Bank News; आजपासून बँकेच्या वेळेत बदल, सकाळी ९ वाजेपासून सुरू होतील बँका

WhatsApp Group

18 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून बँकिंगचे तास बदलणार आहेत. बँका नवीन वेळेला उघडतील आणि बंद होतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) निर्देशानुसार हा बदल करण्यात आला आहे. आजपासून बँका सकाळी ९:00 वाजता उघडतील आणि ४:00 वाजता बंद होतील. ग्राहकांना कामासाठी १ तासाचा जास्त वेळ देण्यात आला आहे.

केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक देशातील बाजार व्यवसाय आणि बँकिंग तास सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. याबाबत सोमवार, 18 एप्रिलपासून बँकांच्या कामकाजात नवी सुरुवात होणार आहे. आता बँका नव्या वेळेमध्ये उघडतील आणि बंद होतील.

सुमारे दोन वर्षांपूर्वी, कोरोना महामारीमुळे, देशातील बँकिंग व्यवसायाची वेळ आणि बाजार व्यवहाराच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे, अशा परिस्थितीमध्ये आरबीआयने जुनी वेळ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, जो आजपासून सुरू होणार आहे.