अ‍ॅशेसचा थरार, चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यास इंग्लंडला यश!

WhatsApp Group

अ‍ॅशेस मालिकेतील सिडनी येथे खेळण्यात आलेला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात इंग्लंडला यश आले आहे. सामन्यात्या पाचव्या दिवशी अखेरच्या काही ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियान संघाला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज होती, पण तो विकेट मिळवण्यात ऑस्ट्रेलियाला अपयश आले आणि सामना अनिर्णित राहिला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्याच डाव 8 बाद 416 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने आपला डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीस मैदानात आलेल्या इंग्लंडच्या संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 294 धावांवर केल्या. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी करत 265 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. यामुळे इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी 388 धावांचे खडतर आणि अशक्यप्राय असे अव्हान मिळाले होते. या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 9 फलंदाजांच्या बदल्यात 270 धावा केल्या आणि चौथी कसोची अनिर्णित केली.


ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात विजयासाठी १ विकेट्सची गरज होती. मात्र तो विकेट मिळवण्या त्यांना यश आले नाही. अखेरच्या काही षटकांमध्ये माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ दमरार गोलंदाजी केली. त्याने जॅक लीचला माघारी धाडत इंग्लंडला नववा धक्का दिला मात्र अखेरचा विकेट माघारी धाडण्यात त्याला यश आले नाही. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात स्कॉट बोलंडने सर्वाधिक ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या

उस्मान ख्वाजाचं धमाकेदार पुनरामण

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजाने धमाकेदार पुनरामण सलग २ शतके ठोकली. ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात ख्वाजाने 137 धावांची शानदाक खेळी साकारली. तर दुसऱ्या डावात ख्वाजाने 101 धावांची नाबाद खेळी करत सामन्यातील सलग दुसरं शतक आपल्या नाववर केलं. त्याने केलेल्या या दमदार फलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आले.

इंग्लंडला मोठा धक्क, अ‍ॅशेस मालिकेतून जोस बटलर बाहेर

अ‍ॅशेस मालिकेतील अखेरच्या आणि पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. डाव्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो पाचव्या सामन्यात आपल्याला खेळताना दिसणार नाही. बटलर इंग्लंडला माघारी परतणार असल्याचे कर्णधार जो रूटने सांगितले आहे.

ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी

अ‍ॅशेस मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना होबार्ट शहरातील बेलेराइव्ह ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळण्यात येणार आहे. या मालिकेत आतापर्यंत खेळण्यात आलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने विजय मिळवून मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी घेतलीय.