
नवी मुंबईमध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे. घणसोली येथील एका आईने आपल्या दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला पण यातून ती थोडक्यात बचावली आहे. नवरा बायकोच्या भांडणातून तिने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील घणसोली भागात ही घटना घडली आहे. पुष्पा गुर्जर (वय 32 ) असं आरोपी आईचे नाव आहे. दिपू गुर्जर मुलगी (4 वर्षझ तर राहुल गुर्जर (1 वर्ष) अशी मृत लहान मुलांची नावं आहेत. पुष्पा गुर्जरचे तिच्या पतीसोबत नेहमी या ना त्या कारणावरून भांडणं होत होती. याच रागातून रविवारी रात्री तिने टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती समोर आली आहे.