शेतकऱ्यांसाठी खूशखबर! उद्या खात्यात जमा होणार ‘इतकी’ रक्कम; जाणून घ्या सविस्तर माहिती

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी (31 मे) किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करणार आहेत. या अंतर्गत 21,000 कोटी रुपयांची रक्कम जारी केली जाईल, ज्याचा फायदा देशभरातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. सद्या पेरणीचा हंगाम तोंडावर असताना उद्या (मंगळवारी) खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कृषी मंत्रालयाने रविवारी 11 व्या हप्त्यासंदर्भात एक निवेदन जारी केळे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी शिमला येथील ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमामधून नागरिकांसोबत संवाद साधणार आहे. गरीब कल्याण संमेलनाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या 16 योजना आणि कार्यक्रमांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसोबत ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधतील. यादरम्यान ते पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जारी करणार आहेत.
11 वा हप्ता खात्यात जमा झाला की नाही असं करा चेक
पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in. होम पेजवर, शेतकरी कॉर्नरमधील लाभार्थी यादीवर क्लिक करा. आता त्यात राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. Get Report वर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल.