Watch Video: किरीट सोमय्या यांचा तो’ व्हिडिओ आला समोर, देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश!

0
WhatsApp Group

मुंबई : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्यास उत्तर देताना मंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही महिलेचा छळ झाला असेल, तर ते योग्य नाही. याबाबत सदस्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तसेच महिलेची ओळख जाहीर न करता चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.