
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रात्रीच्या वेळी तापमानात किंचित घट जाणवत असली तरी, दिवसा कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महानगरातील वाढत्या प्रदूषणामुळे हा बदल होत आहे. मुंबईचे वातावरण अत्यंत विषारी झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिल्लीची हवेची गुणवत्ता मुंबईपेक्षा चांगली आहे. दरम्यान, मुंबईतही दम्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या मते, मुंबईतील हवेचा AQI 250 च्या पुढे गेला आहे. दिवाळीनंतर प्रथमच मुंबईतील AQI 250 च्या पुढे गेला आहे. मुंबईच्या वातावरणात वाढत्या PM 2.5 प्रदूषकांमुळे दम्याचे रुग्ण त्रस्त आहेत. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 262 च्या AQI सह खराब राहिला आहे. लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. मुंबईची हवा दिल्लीपेक्षा वाईट झाली आहे. दिल्लीचा AQI 176 वर आहे. मुंबईत आता श्वास घेणे कठीण झाले आहे.
मालाडमध्ये AQI 320, माझगाव 316, बोरिवली 303 आणि चेंबूर AQI 286, भांडुप 176, कुलाबा 283, वरळी 156, BKC 242, अंधेरी 228 आणि नवी मुंबई AQI 169 नोंदवले गेले. हवेत भरपूर आर्द्रता असल्याचे स्पष्टीकरण ‘सफर’ संस्थेचे संचालक डॉ.गुलफान बेग यांनी दिले. सकाळी आणि संध्याकाळी हलकीशी थंडी जाणवत आहे. त्यामुळे या स्थितीत प्रदूषण वाढत आहे.