नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीगचा नवीन संघ अहमदाबादने Ahmedabad franchise त्यांचे नाव जाहीर केले आहे. अहमदाबाद संघ आयपीएलच्या १५व्या आवृत्तीत ‘गुजरात टायटन्स’च्या Gujarat Titans नावाने मैदानात उतरणार आहे. बुधवारी ही घोषणा करण्यात आली.
अहमदाबादने हार्दिक पांड्याला hardik pandya आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे, तर शुभमन गिल आणि अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.
The Ahmedabad franchise of the Indian Premier League names its cricket team the ‘Gujarat Titans’ pic.twitter.com/2RqUkgPUKc
— ANI (@ANI) February 9, 2022
हार्दिक पांड्या याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता तर राशिद खान आयपीएलच्या 14व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. शुभमन गिल गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता.
अहमदाबाद संघाने यापूर्वीच आपल्या कोचिंग स्टाफची निवड केली आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा असेल तर इंग्लंडचा माजी सलामीवीर विक्रम सोलंकी यांना संघाचे संचालक बनवण्यात आले आहे.त्याचबरोबर भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे संघाचे मार्गदर्शक असतील.
हेही वाचा
हिजाबवरून वाद वाढला; कर्नाटकात 3 दिवस शाळा बंद, हायकोर्टात आज होणार सुनावणी
पुण्यातून लाइट गायब, पाणी पुरवठाही विस्कळीत