IPL 2022: पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्स विजयाचे खाते उघडणार का? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

WhatsApp Group

IPL च्या 15 व्या मोसमातील 23 वा सामना आज मुंबई इंडियन्स Mumbai Indians आणि पंजाब किंग्ज Punjab Kings यांच्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवला जाणार आहे. आयपीएलमधील मुंबईचा आतापर्यंतचा प्रवास खूपच निराशाजनक राहिला आहे. मुंबईने आतापर्यंत 4 सामने खेळले असून सर्व सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यांना 2 सामन्यांमध्ये विजयाची चव चाखायला मिळाली आहे.

आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला या मोसमात मागील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात पूर्णतः अपयश आले आहे. संघाला आपली मोहीम पुन्हा रुळावर आणायची असल्यास अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. संघाचे फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले आहेत, तर गोलंदाजही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत, त्यामुळे संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दमदार फटकेबाजी खेळण्याची क्षमता असलेला डेवाल्ड ब्रेव्हिसही आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे खेळला नाही. संघाला मोठी धावसंख्या करायची असेल किंवा लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल, तर पहिल्या तीनमधील एका फलंदाजाला मोठी खेळी खेळावी लागेल. मुंबईसाठी सर्वात कमकुवत पैलू म्हणजे अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डची कामगिरी.

मात्र मुंबईच्या संघाला कागिसो रबाडाच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या भक्कम गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे. पंजाबच्या संघात राहुल चहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंगसारखे गोलंदाज आहेत. मुंबईकडून लेग-स्पिनर मुरुगन अश्विन, बासिल थंपी आणि जयदेव उनाडकट आणि बुमराहला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मुंबईला शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि शाहरुख खान सारखे मोठे फटके खेळणाऱ्या खेळाडूंचा सामना करावा लागेल.

हेड टू हेड रेकॉर्ड! – पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आजवर 28 सामने खेळले गेले असून यातील 15 सामने मुंबई जिंकले आहेत तर पंजाबने 13 सामने जिंकले आहेत

मुंबई इंडियन्सचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, फॅबियन ऍलन, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, बेसिल थम्पी.

पंजाब किंग्सचा संघ – मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, शाहरुख खान, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.