शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM Kisan निधीचा 13 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार

WhatsApp Group

होळीच्या सणाच्या आधी कृषीमंत्र्यांनी ही बातमी सांगितली आहे ज्याची देशातील करोडो शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. पीएम मोदी कर्नाटकातील बेळगाव येथे हा हप्ता जारी करतील, असे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 13वा हप्ता (13th installment of PM Kisan) 27 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल. म्हणजेच मार्चपूर्वीच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील.

कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी देशातील सुमारे आठ कोटी पीएम शेतकरी लाभार्थ्यांना हा हप्ता जारी करतील. यासोबतच ते शेतकऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. कृषी मंत्री तोमर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 13 वा हप्ता हस्तांतरित करतील आणि शेतकरी बंधू-भगिनींशी संवाद साधतील.

PM Kisan: या चुकांमुळे अनेकदा अडकतो पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता

गेल्या वर्षभरात या योजनेचा बनावट लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने या यादीतून वगळले आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी 31 मे रोजी 10.45 कोटी शेतकऱ्यांना 11 वा हप्ता म्हणून 22,552 कोटी रुपये जारी केले होते. परंतु 12 व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या 8.42 कोटी इतकी कमी झाली, ज्यांना केवळ 17,443 कोटी रुपये दिले गेले. पारदर्शकता आणण्यासाठी आणि फसवणूक कमी करण्यासाठी सरकारने हा नियम केला आहे. यावेळी राज्य सरकारांनी या प्रकरणाची पूर्ण काळजी घेतली आहे.

PM Kisan Yojana: पंतप्रधान किसान योजनेत सरकारने केला ‘हा’ मोठा बदल

आपल्या ट्विटमध्ये कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच, सध्याच्या शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन KYC करून घ्यावे लागेल. या वेबसाइटवर, उजव्या बाजूला, तुम्हाला फार्मर्स कॉर्नर पर्यायावर eKYC लिंक दिसेल. येथे आधार क्रमांक टाकून आवश्यक माहिती द्यावी लागेल. सबमिट वर क्लिक करताच प्रक्रिया पूर्ण होईल.