राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा फक्त ऑफलाइनचं होतील

WhatsApp Group

मुंबई – राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइनचं घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच निश्चित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जातील. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांच्या मंगळवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ऑनलाइन परीक्षा आणि परीक्षांच्या तारखा वाढवण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यानंतर प्रश्न निर्माण झाला की परीक्षांशी संबंधित नियमांमध्ये काही बदल होणार का? याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं होता. परीक्षा पूर्वनियोजित पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल.

दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. अनेक परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. खूप नुकसान झाले आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्याचे कारण नाही. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असून ती वेळेवरच घेतली जाणार आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील धारावी येथील शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराचा हजारो विद्यार्थ्यांनी अचानक घेराव केला. यानंतर विद्यार्थ्यांच्या समस्यांवर चर्चा करू, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. मात्र सध्या तरी परीक्षेबाबत कोणताही बदल केला जाणार नसल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यातं आले आहे.

ऑफलाइन परीक्षेची तयारी पूर्ण

राज्यभरात ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी बोर्डाकडे यंत्रणा नाही. सोमवारी वर्षा गायकवाड यांनी आंदोलनादरम्यानही असे सांगितले होते की, महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात भौगोलिकदृष्ट्या खूप फरक आहे. दूरवरच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षेची व्यवस्था करणे शक्य नाही.