सोशल मीडियाच्या या युगात बातम्यांचा झपाट्याने प्रसार होणे ही काही नवीन गोष्ट नाही. आता सेलिब्रिटींची कोणतीही बातमी त्यांच्या चाहत्यांपासून लपलेली नसते. अशा परिस्थितीत कधी-कधी स्टार्सच्या मृत्यूच्या खोट्या अफवाही उडू लागतात. आता पुन्हा एकदा ‘थपकी प्यार की’ अभिनेत्री जिज्ञासा सिंहसोबत असेच काहीसे घडले आहे. आहे. अभिनेत्रीच्या निधनाच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरू लागल्या, त्यानंतर तिला स्वतःच चाहत्यांसमोर यावे लागले. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण.
युट्यूबचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यात लिहलं होतं की थपकी फेम अभिनेत्री जिज्ञासा सिंह हिचे कार अपघातात निधन झाले आहे. रुग्णवाहिका आणि आजूबाजूची गर्दीही दिसत आहे. अखेर जिज्ञासानेच यावर पुढे येत स्पष्टीकरण दिलं आहे.
जिज्ञासा म्हणाली, ‘कोण आहेत ते लोक जे अशा बातम्या पसरवत आहेत. मी जिवंत आहे. चमत्कारी चमत्कार. अशा खोट्या बातम्या फेक चॅनेल्सवर पसरवणे बंद करा.
View this post on Instagram
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये आपली निराशा व्यक्त करण्यास सुरुवात केली. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हे खूप चुकीचे आहे, लोक एखाद्याच्या मृत्यूची चुकीची बातमी कशी पसरवू शकतात. दुसऱ्या युजरने लिहिले, सोशल मीडियाचा हा अतिशय चुकीचा वापर आहे. एखाद्याचा मृत्यू हा विनोद नाही.