मोठी बातमी : इस्लामिक हॅकर्सकडून ठाणे पोलिसांची वेबसाईट Hacked

WhatsApp Group

ठाणे – एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे पोलिसांची (Thane police) वेबसाईट (website Hacked)हॅक झाल्याचं समजतंय. इंडोनेशियन हॅकर्सने ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक (Thane police website) केली होती. दरम्यान काही मिनिटांतच सायबर हल्ला परतवला आहे.

ठाणे पोलिसांनी हा सायबर हल्ला काही मिनिटांतच परतवला आहे. दरम्यान राज्यातील अनेक महत्त्वाच्या वेबसाईट हॅक झाल्याचा दावा सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी केला आहे.ठाणे पोलिसांची वेबसाइट इस्लामिक हॅकर्सनी हॅक केली होती. मलेशियाच्या हॅकर ग्रुप ड्रॅगन फोर्सद्वारे विविध गटांतील अनेक हॅकर्स सक्रिय झाले असल्याची माहिती समोर आली आहे.