मोठी बातमी: ठाण्यातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचं निधन

WhatsApp Group

ठाणे – ठाण्यातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे प्रदीर्घ आजारामुळे खाजगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे. शनिवारी ७ मे रोजी दुपारी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुलेखा आणि मुलगा प्रन्मय असा परिवार आहे. त्यांनी चार वेळा स्थायी समिती आणि एकदा परिवहन समितीचे सभापती पदही भुषविले होते.

ठाण्यातील नामांकित माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण (Sudhakar Chavan) यांचे आज शनिवारी दुपारी प्रदीर्घ काळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रभागात एकच शोककळा पसरली आहे. गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.

सुधाकर चव्हाण यांनी महापालिकेमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. प्रत्येक निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडून येणे ही त्यांची खासियत होती. १९९२ ते २०१७ असे तब्बल २५ वर्षे म्हणजेच पाच टर्म ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच अपक्ष म्हणून त्यांनी तिघांचे पॅनलही पालिकेवर निवडून आणले होते. मधल्या काळात त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यावेळेसही त्यांनी मनसेचे दोन नगरसेवक निवडून आणले होते.