जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, आयईडी आणि इतर साहित्य जप्त

WhatsApp Group

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे. जिल्ह्यातील सुरणकोट सेक्टरमधील हरी मारोटे गावात सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा हा अड्डा सापडला. रविवारी रात्री उशिरा लष्कर, पोलिस आणि एसओजीसह सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचे हे अड्डे सापडले, जिथून पाच आयईडी, वायरलेस सेट आणि काही कपडे जप्त करण्यात आले.