
तेलंगणातील मंचरयाला जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा एका घराला भीषण आग लागली. या घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. वृत्तानुसार, शिवय्या (50), त्याची पत्नी पद्मा (45), मोनिका (23), पद्माच्या मोठ्या बहिणीची मुलगी आणि त्यांच्या दोन मुली या आगीत जिवंत जाळल्या गेल्या.
इन्स्पेक्टर कुमार यांनी सांगितले की शेजाऱ्यांनी गावकऱ्यांना आणि नंतर पोलिसांना आगीची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, घरात उपस्थित असलेल्या एकूण सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. आग कशामुळे लागली याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Telangana | Six people, including two children, were charred to death after a fire broke out in their house in Mancherial district last night pic.twitter.com/RZC7zGtg53
— ANI (@ANI) December 17, 2022