रत्नागिरी – रत्नागिरीतील खेड तालुक्यात असलेल्या लोटे एमआयडीसीमध्ये केमिकलमुळे मोठा स्फोट झाला आहे. स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आळे आहे.एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये मोठ-मोठे स्फोट झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातवारण पसरळे आहे. जखमींना परशुराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या लोटे एमआयडीमध्ये प्रिवी ऑर्गेनिक्स लि. कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. एकाच कंपनीमध्ये तब्बल ६ ते ७ वेळा स्फोट झाल्यामुळे संपूर्ण परिसर हादरला होता. रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास स्फोट झाला असून आग लागली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्ठळी धाव घेतली होती. आग इतकी भीषण होती की कंपनीपासून दहा किलोमीटरच्या अंतरावरुन धुराचे लोट दिसत होते. आगीमध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.