मुंबईतील वांद्रे येथे सिलेंडरचा भीषण स्फोट, 5 जण जखमी

0
WhatsApp Group

मुंबई : शहरातील वांद्रे परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत 5 जण जखमी झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिलेंडरला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मुंबईत यापूर्वीही आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

अपघातात पाच जण जखमी : वांद्रे येथील गजधर डॅम रोडवरील फिटर गलीमध्ये हा अपघात झाला आहे. येथे अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. 18 नोव्हेंबर, शनिवारी म्हणजेच आज सकाळी 06.19 वाजता हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून परिसर हादरला. सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची माहिती स्थानिक लोकांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्यास सुरुवात केली. सकाळी 7.15 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातात एकूण पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व जखमींना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर येथील डॉक्टर उपचार करत आहेत. जखमींमध्ये 53 वर्षीय निखिल जोगेश दास, 38 वर्षीय राकेश रामजनम शर्मा, 65 वर्षीय अँटोनी पॉल थेंगल, 54 वर्षीय कालीचरण मजीलाल कन्नौजिया आणि 31 वर्षीय शान अली झाकीर अली सिद्दीकी यांचा समावेश आहे.

रेसलर द ग्रेट खली दुसऱ्यांदा बनला बाबा, पत्नी हरमिंदर कौरने मुलाला दिला जन्म

मालाड परिसरातही आग लागली: याआधीही गुरुवारी रात्री मुंबईच्या उपनगरातील मालाड येथे भीषण आग लागली होती. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मालाड इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये रात्री 9.30 च्या सुमारास आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस, स्थानिक महापालिका कार्यालय, अदानी पॉवर आणि इतर यंत्रणांचे कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसून आगीचे कारण अद्याप कळू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Avneet Kaur: अवनीत कौरने लाल ड्रेसमध्ये केला कहर, पहा व्हिडिओ