मध्य प्रदेशात बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 41 जण जखमी

WhatsApp Group

मध्य प्रदेशात इंदूर येथून राजस्थानकडे जात असलेल्या बसचा रतलाम जिल्ह्यामध्ये भीषण अपघात (terrible accident) झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक ट्रॅव्हल्स मंदसौरची टुरिस्ट बस पहाटे ४ वाजेच्या सुमारास रतलाम जिल्ह्यामधील जावरा तालुक्यातील धोधरजवळील रिछा गावातील चांदा ढाब्यासमोर पलटली आहे.

या अपघातामध्ये एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील ४१ प्रवाशांची (passengers) प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना जावना येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ६ जणांना रतलाम जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाने जावरा जवळील ढाब्यावर जेवण केले. तिथून बस जोधपूरकडे निघाली होती. यानंतर बस धोधरजवळील रुपनगर फांते येथील ढाब्याजवळ उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत बस मोठ्या झाडावर जोरात आदळल्यामुळे बस पलटी झाली. या अपघाताच्या वेळी बसचा वेग साधारण १०० ते १२० किमी इतका होता. बस उलटली तेव्हा बहुतांश प्रवासी झोपलेले होते. यामुळे अपघातानंतर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. बस सरळ करण्यासाठी घटनास्थळी क्रेन मागवण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.