चिनमध्ये इमारतीला भीषण आग, थरारक व्हिडिओ आला समोर

WhatsApp Group

चीनची राजधानी बीजिंगमध्ये एका उंच इमारतीला भीषण आग लागली आहे. राजधानीच्या चांगशा परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. राज्य माध्यमांनी शुक्रवारी वृत्त दिले की मृतांच्या संख्येबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदतकार्यात सुरू केले. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

या आगीत एका उंच इमारतीला आग लागल्याचे वृत्त आहे. या इमारतीत सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमचे कार्यालय होते. सीसीटीव्हीने प्रसिद्ध केलेल्या एका छायाचित्रात इमारतीच्या मध्यभागी आग लागल्याने मोठ्या ज्वाळा उठत असल्याचे दिसून आले आहे.