बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान Sara Ali Khan नेहमीच तिच्या फ्लर्टी स्टाईलसाठी ओळखली जाते. काही काळापूर्वी साराच्या नाकावर एका आपघातामुळे जखम झाली होती. आता पुन्हा एकदा सारा अपघातातून थोडक्यात वाचली आहे.
सारा अली खान एका चित्रपटाच्या सेटवर मेकअप करत असताना हा प्रकार घडला. ज्यामुळे सारा खूप घाबरली होती. खरं तर सारा अली खान मेकअप रूममध्ये टचअप घेत होती आणि तेव्हाच तिच्या चेहऱ्याजवळचा बल्ब फुटला आणि सारा थोडक्यात वाचली
Insta Update| Via Sara’s insta story❤️#SaraAliKhan @SaraAliKhan pic.twitter.com/RFL5y2QSYU
— Sara Times???? (@Saratimes95) January 23, 2022
ही घटना रविवारी घडली, ज्याचा व्हिडिओ सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, सारा टच अप घेत आहे, ‘जीतूला नारळ पाणी आणायला सांगा’ असे म्हणत आहे. यादरम्यान, मेकअप आर्टिस्ट तिथून निघून जाताच, सारा कॅमेऱ्यात स्वतःचे कौतुक करू लागते आणि अचानर बल्ब फुटतो आणि लहानसा स्फोट होतो.