मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

WhatsApp Group

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव खिंडीमध्ये एका कारने आराम बसला समोरुन जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या अपघातामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

संदीप पाटील असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. इतर दोन जणांची नावे अद्याप समोर आली नाहीत. जखमींना महाड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर Mumbai-Goa Highway दीपक पाटील हा चालक पाच जणांना आपली बेलोन कार घेऊन भरधाव वेगाने कल्याणकडे निघाला होता. मध्यरात्री पावणे एकच्या दरम्यान कार महाड दासगाव खिंडीमध्ये आली.

यावेळी या कारने समोरुन येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी चालकाविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालकाच्या हयगय आणि भरधाव वेगामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे.