मोहोळ-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघात ; ६ जणांचा मृत्यू

WhatsApp Group

मोहोळ-पंढरपूर महामार्गावर दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात चौघे जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजानक असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून यामध्ये मोहोळ शहरातील डॉक्टर पती-पत्नीचा तसेच त्यांच्या नातेवाईकांचा आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

डॉ. आफरिन मुजाहिद अत्तार, डॉ. मुजाहिद अत्तार, मुलगा अरमान अत्तार, डॉ. आफरीन यांचे बंधू इरफान खान, त्यांच्या पत्नी बेनझीर इरफान खान, मुलगी अनाया इरफान खान या सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर स्कॉर्पिओ गाडी मधील राजेंद्र हुंडेकरी, रामचंद्र शेटे मंदाकिनी शेटे हे सर्व गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

हा अपघात इतका भीषण होता की खान यांच्या कारचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. अपघात पाहून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचे प्रयत्न केले. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना सोलापुरात उपचारासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. तर मृतांना मोहोळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे.