वारकऱ्यांच्या गाडीचा भीषण अपघात,एकाचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी

WhatsApp Group

सातारा – वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे (Pandharpur wari) वेध लागले आहे. पण, साताऱ्यामध्ये वारकऱ्यांचा गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आयशर ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सातारा- पुणे महामार्गावर शिरवळ इथे खडाळा गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. एक भरधाव आयशर टेम्पोने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी पंढरपूर पायी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर निघाली होती.

शिरवळ इथे खडाळा गावाच्या हद्दीत पोहोचले असता आयशर ट्रकने पाठीमागून वारकऱ्यांच्या ट्रॉलीला जोराची धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. हा अपघात एवढा भीषण होता की, धडकेनंतर आयशर ट्रक पलटी झाला आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी बाहेर फेकले गेले. ट्रॉलीचा पाठीमागच्या भाग चक्काचूर झाला आहे.