गुजरातमधील सुरतमध्ये भीषण अपघात, 5 मजली इमारत कोसळल्याने 15 जण जखमी

WhatsApp Group

गुजरातमधील सुरत शहराला लागून असलेल्या पाली गावात इमारत कोसळून 15 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले. ही इमारत बरीच जुनी आणि जीर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबले जाण्याची शक्यता आहे.

इमारतीची मालक परदेशी महिला आहे
15 जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली 5 ते 6 लोक अडकल्याचा संशय आहे. ढिगारा हटवण्यासोबतच अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या 5 मजली इमारतीत 35 खोल्यांमध्ये लोक भाड्याने राहत होते. इमारत बरीच जीर्ण झाली होती. या इमारतीची मालक परदेशी महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. खोली भाड्याने देण्यासाठी त्यांनी एक व्यक्ती ठेवली होती.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सचिन जीआयडीसी परिसरात असलेली ही इमारत कोसळली. स्फोटामुळे इमारत कोसळल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना समजली. लोकांनी घटनास्थळी पोहोचून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. प्रशासनालाही अपघाताची माहिती देण्यात आली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आहे. इमारत कोसळली तेव्हा काही लोक बाहेर आले होते. सध्या ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.