ITBP Bus Accident: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये भीषण अपघात, 39 जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली

WhatsApp Group

Pahalgam Road Accident: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. अनंतनागमधील चंदनवाडीजवळ इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात आयटीबीपीच्या चार जवानांचा मृत्यू झाला असून 37 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमरनाथ यात्रेत आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते.

बसमध्ये 39 सैनिक होते. ज्यामध्ये ITBP चे 37 जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे 2 जवान सामील होते. बसचे ब्रेक फेल झाल्याने ती अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. या अपघातात मोठ्या संख्येने जवान जखमी होण्याची भीती आहे.