मध्य प्रदेशात भीषण अपघात! 13 जणांचा मृत्यू

0
WhatsApp Group

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी प्रवाशांनी भरलेल्या बसला अचानक आग लागली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुहई मंदिराजवळ हा अपघात झाला. या घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने जिल्हा रुग्णालय गुनाचे सीएचएमओ डॉ. एस. भोला यांच्या हवाल्याने सांगितले की, अपघातस्थळावरून 11 जणांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बाकीच्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बस एका डंपरला धडकली, त्यानंतर बसला आग लागली आणि प्रवासी पेटू लागल्याचे सांगण्यात येत आहे. बस गुनाहून आरोनला जात होती. या आगीत 15 जण भाजले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.