धक्कादायक, ऑनलाइन गेममुळे 14 वर्षीय मुलाने केली आत्महत्या!

WhatsApp Group

मुंबईत मोबाईल गेममुळे एका 14 वर्षीय मुलाने आत्महत्या Teen Boy Suicides केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण भोईवाडा भागातील mumbai bhoiwada आहे. या 14 वर्षीय मुलाने आपल्या कुटुंबीयांकडून गेम चॅलेंज पूर्ण करण्याची आणि ऑनलाइन गेम खेळण्याची मागणी केली होती परंतु त्याच्या घरचे त्याला नकार देत होते, त्यानंतर त्याने आत्महत्या केली.

या विद्यार्थ्याने गेममधील चॅलेंज पूर्ण करण्यासाठी एवढे मोठे पाऊल उचलल्याचे या घटनेचा तपास करणाऱ्या भोईवाडा पोलिसांकडून समजले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातवीत असलेल्या या मुलाला फ्री फायर गेम्स खेळण्याची सवय होती. या विद्यार्थ्याचे व्यसन नव्हते, असे मुलाच्या पालकांचे म्हणणे असले तरी तो अधूनमधून फ्री फायर गेम खेळत असे.

मुलाचे आई आणि बाबा कामानिमित्त बाहेर गेले होते. दोघेही घरात पोहोचले असता मुलाने दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडल्यानंतर मुलगा मृतावस्थेत आढळून आला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.