एक नेता, एक झेंडा, एक मैदान..,उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर

WhatsApp Group

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर केवळ महाविकासआघाडी सरकार कोसळलं नाही, तर शिवसेना नक्की कोणाची हा प्रश्न निर्माण झालाय. राज्यात शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटात प्रचंड चुरस वाढली आहे. दरम्यान आता दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला. आता ठाकरे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा ट्रेलर लाँच केलाय. याची सध्या जोरदार चर्चा आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा