
27 ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून मीडिया रिपोर्ट्सनुसार ते आशिया कपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशिया कपमध्ये सहभागी होण्यासाठी आज रवाना होणार आहे. मात्र, प्रशिक्षक पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आगामी स्पर्धेसाठी संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण आशिया कपनंतरच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होणार होती.
JUST IN: Rahul Dravid won’t be travelling to the UAE, immediately at least. In his absence, arrangements are being made to send VVS Laxman to join the Indian team at the Asia Cup.https://t.co/2gVLLHpwhE
— Cricbuzz (@cricbuzz) August 23, 2022
भारताचे माजी फलंदाज राहुल द्रविडची नोव्हेंबर 2021 मध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली. अलीकडेच त्यांना भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची या दौऱ्यासाठी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 3-0 ने मालिका आपल्या नावावर केली.
गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत गट टप्प्यात बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताच्या टी-20 क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीत बदल केला आहे आणि संघाला चांगले परिणाम मिळाले आहेत. पण आशिया चषक स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक द्रविड यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. राहुल द्रविड आशिया चषकासाठी संघासोबत जाणार की ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत हे अद्याप निश्चित झालेले नाही.