IND vs SA: मिलरचं झंझावाती शतक वाया, टीम इंडियाने जिंकला दुसरा T20 सामना, मालिका केली नावावार

WhatsApp Group

IND vs SA 2nd T20: गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला. 238 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 221 धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून डी कॉकने नाबाद 69 धावांची खेळी केली. त्याचवेळी मिलरने 106 धावांचे शानदार शतक झळकावले. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि भारतीय संघाने हा सामना 16 धावांनी जिंकला. घरच्या मैदानावर खेळताना टीम इंडियाने प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिका जिंकली आहे.

238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि अवघ्या एका धावेवर संघाचे 2 फलंदाज बाद झाले. संघाला पहिला धक्का कर्णधार बावुमाच्या रूपाने तर दुसरा धक्का रिले रुसोच्या रूपाने बसला. अर्शदीप सिंगने या दोन्ही आफ्रिकन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर मार्कराम आणि डी कॉक यांनी आफ्रिकेचा डाव सांभाळला आणि संघाची धावसंख्या 40 पर्यंत नेली, पण चांगली फलंदाजी करणारा मार्कराम 33 धावांवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. हेही वाचा – WIDE न दिल्याने अंपायरवर चिडला रोहित शर्मा, रागाच्या भरात DRS ची मागणी, VIDEO झाला व्हायरल

मार्कराम बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि डी कॉक यांनी डावाची धुरा सांभाळली आणि आफ्रिकेची दुसरी विकेट पडू दिली नाही. आफ्रिकन संघातर्फे डेव्हिड मिलरने 47 चेंडूंत सात षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने 106 धावांची शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय क्विंटन डी कॉकने 48 चेंडूंत चार षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 69 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. मात्र, या दोघांची खेळीही आफ्रिकन संघाला जिंकू शकली नाही आणि भारताने हा सामना 16 धावांनी जिंकला.

भारताने दिले होते 238 धावांचे लक्ष्य

नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 9.5 षटकांत 96 धावा जोडल्या. रोहित शर्माने 37 चेंडूत 43 धावा केल्या, तर केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले.

हे दोघे बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफानी फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 5 चौकार मारले. याशिवाय विराट कोहलीने 28 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. या फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताला 237 धावांची मोठी धावसंख्या उभारता आली. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि 221 धावा करून 16 धावांनी सामना गमावला.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा