Team India New Batting Coach: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मिळाला नवा कोच, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Team India New Batting Coach: बॉ
र्डर गावस्कर ट्रॉफी भारतीय संघासाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हती. मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने गेल्या ४ सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली. यामुळेच टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन भूमीवर ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने कोचिंग युनिटमध्ये बदल केले आहेत. संघात एका नवीन फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती झाली आहे.
नवीन फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती
ऑस्ट्रेलियातील लाजिरवाण्या पराभवापूर्वी, भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही ३-० असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. सततच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियामध्ये मोठा बदल झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, माजी स्थानिक क्रिकेट खेळाडू सीतांशू कोटक यांची भारतीय संघाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सिताशू हे इंडिया अ चे मुख्य प्रशिक्षक देखील राहिले आहेत. त्यांनी अनेक वेळा भारतीय वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. २०२३ मध्ये, भारताने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली आयर्लंडचा दौरा केला, जिथे ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या दौऱ्यात सीतांशू कोटक हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.
कारकिर्द
५२ वर्षीय कोटकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पण या खेळाडूला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी कधीच मिळाली नाही. त्याच्या कारकिर्दीत त्याने १३० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४१.७६ च्या सरासरीने ८०६१ धावा केल्या आहेत. त्याने ८९ लिस्ट ए सामन्यांमध्ये ३०८३ धावा केल्या आहेत. याशिवाय, या माजी खेळाडूने ९ टी-२० सामन्यांमध्ये १३३ धावा केल्या आहेत.