टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच, बीसीसीआयने शेअर केला फोटो

WhatsApp Group

पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक T20 World Cup स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे team India new Jersey . BCCI ने रविवारी मेगा इव्हेंटसाठी भारताची नवीन जर्सी लाँच केली आहे. T20 विश्वचषक 2022 साठी निवड समितीने सोमवारीच 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली.

भारतीय संघाने सध्या परिधान केलेली जर्सी नेव्ही ब्लू आहे. मात्र यावेळी भारतीय संघाच्या जर्सीचा रंग निळा आहे. गेल्या विश्वचषकाच्या जर्सीला बिलियन चीअर्स जर्सी असे नाव देण्यात आले होते आणि त्याचा पॅटर्न टीम इंडियाच्या चाहत्यांना प्रेरित होता.  रविवारी, बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टमध्ये नवीन किट परिधान केलेल्या खेळाडूंचा फोटो शेअर केला.


यात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि महिला संघातील सदस्य हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि रेणुका सिंग यांनी नवीन जर्सी परिधान केली आहे. नवीन जर्सीमधील खांदे आणि बाही गडद निळ्या रंगाचे आहेत आणि उर्वरित किट हलक्या निळ्या रंगाचे आहे. जर्सीच्या डाव्या बाजूला एक लहान डिझाइन देखील आहे.