T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा, ऋषभ पंतचे पुनरागमन

0
WhatsApp Group

Team India squad For T20 World Cup 2024: टी-20 क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा टी-20 विश्वचषक आयपीएल 2024 नंतर लगेच खेळली जाणार आहे. 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा या स्पर्धेत टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे.

रोहित शर्मा पुन्हा एकदा टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर विराट कोहलीलाही या संघात स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्याचबरोबर संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.

विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या फलंदाजीत रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांना 2 यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. तर केएल राहुलला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

यावेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडी पाहायला मिळणार आहे. चहल बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता आणि त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातूनही बाहेर ठेवण्यात आले होते. पण आयपीएल 2024 मध्ये चहलची कामगिरी खूप चांगली राहिली आहे, आतापर्यंत चहलने 9 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. आता पुन्हा एकदा चहल टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.

श्रेयस अय्यर, इशान किशन आणि केएल राहुल या खेळाडूंना टी- 20 विश्वचषकासाठी वगळण्यात आले आहे. आयपीएल 2024 मध्ये इशान किशन आणि श्रेयस अय्यर फारशा फॉर्ममध्ये नाहीत. याशिवाय या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयच्या केंद्रीय करारातूनही बाहेर ठेवण्यात आले आहे.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम 

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

टीम इंडियाने गेल्या 11 वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. भारताने शेवटचा टी-20 विश्वचषक 2007 मध्ये जिंकला होता. अशा स्थितीत यावेळी भारतीय खेळाडूंच्या नजरा ट्रॉफीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवण्याकडे असतील.