IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवन असेल कर्णधार

WhatsApp Group

Team India for 3 ODIs against Zimbabwe: भारताने झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत शिखर धवन पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेतून मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी हे देखील संघात नाहीत. धवनने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि कॅरेबियन भूमीवर प्रथमच वनडेमध्ये 3-0 असा क्लीन स्वीप केला.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज दीपक चहरचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएल 2022 मध्ये तो जखमी झाला आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर होता. त्याच्याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी या खेळाडूंनीही वनडे संघात पुनरागमन केले आहे. भारताला 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

भारताचा संघ – शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.