T20 World Cup 2023 : ICC महिला T20 विश्वचषक 2023 साठी टीम इंडियाची घोषणा

WhatsApp Group

दक्षिण आफ्रिकेत जानेवारीपासून सुरू होणारी तिरंगी मालिका आणि आयसीसी महिला T20 विश्वचषक 2023 साठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. याआधी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत तिरंगी मालिकाही खेळणार आहे. “भारतीय महिला निवड समितीने दक्षिण आफ्रिकेत जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी आणि आगामी आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 साठी भारतीय संघाची निवड केली आहे,” असे बीसीसीआयने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे.

ICC महिला T20 विश्वचषक 10 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होणार आहे. टीम इंडिया 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडिया ग्रुप 2 मध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंडसह आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील. यानंतर 26 फेब्रुवारी 2023 रोजी फायनल होणार आहे.

T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया तिरंगी मालिका खेळणार आहे, जी 19 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. निवेदनात म्हटले आहे की, पूजा वस्त्राकरच्या संघात सामील होणे तिच्या फिटनेसवर अवलंबून असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका वगळता वेस्ट इंडिज हा तिरंगी मालिकेतील तिसरा संघ आहे. या मालिकेत भारताने चांगली कामगिरी केल्यास टी-29 विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यास मदत होईल.

T20 विश्वचषक 2023 साठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर , अंजली सरवानी, पूजा वस्त्रेकर, राजेश्वरी गायकवाड आणि शिखा पांडे.

तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), यस्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, अंजली वर्मानी, सुषमा सरवानी, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, सभिनेनी मेघना, स्नेह राणा आणि शिखा पांडे

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा