बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, पहा कोण कोण आहे टीममध्ये…

WhatsApp Group

भारतीय महिला क्रिकेट संघाला या महिन्यात बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र निवड समितीने या दौऱ्यासाठी अनेक स्टार खेळाडूंना संघाबाहेर ठेवले. ज्यामध्ये एक नाव स्टार विकेटकीपर फलंदाज रिशा घोषचे देखील आहे.

उजव्या हाताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि यष्टीरक्षक ऋचा घोष यांना डावलून 9 जुलैपासून मीरपूर येथे सुरू होणाऱ्या बांगलादेशच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी भारताने 18 सदस्यीय भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली. या दोघांशिवाय युवा ऑफस्पिनर श्रेयंका पाटीलकडे दुर्लक्ष करण्यात आले. भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.

शेर-ए-बांगला स्टेडियमवर सामने खेळवले जातील
सर्व 6 सामने मीरपूर येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (SBNCS) येथे खेळवले जातील. हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधार आहे.

भारतीय टी-20 संघ 
हरमनप्रीत कौर (क), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (विकेटकीपर), अमनजोत कौर, एस मेघना, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी , मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, मिन्नू मणी.

भारतीय एकदिवसीय संघ
हरमनप्रीत कौर (क), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (विकेटकीपर), अमनजोत कौर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी , मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, स्नेह राणा.