शिक्षकांना शाळेच्या वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी

WhatsApp Group

सध्याच्या काळात मोबाईलशिवाय राहणं म्हणजे अशक्यप्राय असं काम आहे. कारण कोणतेही काम असो ते मोबाईद्वारे करण्याची आपणाला सवय झाली आहे. मग ते (Mobile) आपले आर्थिक व्यवहार असो गाडी बुकींग असो अशी सर्व काम आपण मोबाईलद्वारे करतो. शिवाय आपले मनोरंजन करण्यासाठी तर त्याचा भरपूर उपयोग होतो. मात्र, हाच मोबाईल आपल्या कामाच्या वेळेत वापरला तर आपलं कामावरुन दुर्लक्ष होतं राहतं हे देखील तेवढेच खरं आहे.

कोरोना काळापासून (Corona) तर अगदी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना मोबाईलचाच आधार होता. मात्र, आता शाळा सुरु झाल्या असून सोलापुरमध्ये (Solapur) प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना मोबाईल वापरण्यावर आता निर्बंध लागू केले जाणार आहेत. शिवाय शाळेच्या (School) सुट्टीतच शिक्षकांना मोबाईल वापरता येणार आहेत.

शाळेच्या वेळेत शिक्षकांना मोबाईल वापरण्यावर आता निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यावर शाळा व्यवस्थापन समिती वॉच ठेवेल, असंही त्यांनी सांगितलं. मुलांना शिकवताना त्यात व्यत्यय नको म्हणून हा आदेश नवीन शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे.