शिक्षकानेच 13 विद्यार्थ्याींनींवर केला बलात्कार, 9 मुली राहिल्या गर्भवती!

WhatsApp Group

इंडोनेशियन न्यायालयाने एका इस्लामिक बोर्डिंग स्कूल लैंगिक शोषण प्रकरणात 13 विद्यार्थ्याींनींवर बलात्कार केल्याप्रकरणी हॅरी विरवान या शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो 5 वर्षांपासून मुलींवर बलात्कार करत असल्याचे उघड झाले. यातील अनेक विद्यार्थीनी या गरीब कुटुंबातील असून शिष्यवृत्तीवर शाळेत जात होत्या. गेल्या वर्षी एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भवती केल्याप्रकरणी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आरोपीची पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. 13 विद्यार्थ्याींनींपैकी 9 मुली गर्भवती राहिल्याने पूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.

बांडुंग बलात्कार प्रकरणाने काही शाळांमधील लैंगिक शोषणाच्या समस्येवर प्रकाश टाकला आहे, 18 पैकी 14 प्रकरणे गेल्या वर्षी पेसेंटेरेनमध्ये राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाकडे नोंदवली गेली होती. गेल्या वर्षी, दक्षिण सुमात्रा येथील बोर्डिंग स्कूलमधील दोन शिक्षकांना एका वर्षात 26 विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. आणि 2020 मध्ये, पूर्व जावामधील बोर्डिंग स्कूलच्या नेत्याला 15 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रपति जोको विडोडो यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. सरकारी वकिलांनी केमिकल कास्ट्रेशन आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती योहानेस पूर्णोमो सूर्यो आदि यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली